Samruddhi Masik
नोव्हेंबर 8, 2011प्रशिक्षण-ज्ञानदिशेचा झरोका….!
ऑगस्ट 20, 2010नागरी बॅंका/पतसंस्था यांच्या साठी सामाजिक कार्य पुरस्कार
ऑगस्ट 13, 2010
महाराष्ट्रभर नागरी बॅंका, पतसंस्था या आपले बॅंकिंग व्यवहार नीट पार पाडत असतानाही काही चांगले सामाजिक उपक्रम राबवित असतात. काही सेवाभावी प्रकल्प चालवितात तर कधी अशा संस्थांना/कार्यकत्यांना आपल्या नफ्यातून दरवर्षी नेमाने काही रक्कम देऊन त्यांच्या कार्यात आपला वाटा उचलत असतात, त्यांचा उत्साह आणि चांगले कार्य करणाऱ्यांच्या पाठीशी समाज असतो, ही त्यांची श्रद्धा बळकट करीत असतात.
प्रगतीची माहिती आकडेवारी पाठवा
जुलै 31, 2010अहवाल मुखपृष्ठ
जुलै 26, 2010![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
संस्था अहवाल मुखपृष्ठ
नागरी बँका, पतसंस्था यांच्या वार्षिक सभांचा काळ सुरु आहे. त्यांचे अहवाल तयार झाले असतील. अहवाल आम्हाला पाठवले तर त्याचे मुखपृष्ठ व थोडी माहिती येथे प्रसिध्द करता येईल. यात उत्तम ठरलेल्या अहवाल मुखपृष्ठाला पुरस्काराने गौरवण्यात येईल. मुखपृष्ठाची जेपीजी फ़ाईल शक्यतो ई-मेल पाठवावी.
111 व्या घटना दुरूस्तीचे सर्वच राज्यातील सहकार कायद्यात एकसूत्रता येणार
जुलै 24, 2010आता नागरी बॅंकेचे विलीनीकरण व्यापारी बॅंकात लांब नाही
जुलै 19, 2010अशक्त किंवा कमकुवत बॅंकेचे दुसऱ्या बॅंकेत विलीनीकरण होणे ही बॅंकींग क्षेत्रातील नविन बाब नाही. नरसिंहम समितीच्या शिफारशी यावयाच्या आगोदर सहकारी क्षेत्रात आणि व्यापारी क्षेत्रात अशी विलीनीकरण होत होती. नरसिंहम समितीने देशातील बॅंकांची संख्या कमी करण्याचे दृष्टीने आणि अतिशक्तीशाली बॅंका निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून विलीनीकरणाची शिफारस केली. नागरी बॅंकिंग क्षेत्रातील काही वाईट प्रवृत्तीमुळे रिझर्व्ह बॅंकेने नागरी बॅंकांसमोर जे चार पर्याय ठेवले त्यात विलीनीकरणाचा विषय आहे. व्यवसाय चालवता येत नाही, निष्क्रीय जिंदगीचे प्रमाण खुप आहे, आर्थिक घोटाळा आहे. अशा बॅंकांनी विलीनीकरणाची तयारी दाखवली आणि त्यांस तशा बॅंका मिळाल्याही. परंतु अशी विलीनीकरणे सहकारी बॅंकेअंतर्गतच होती. काही नागरी बॅंकांनी परराज्यातील बॅंकाही स्वत:मध्ये सामावून घेतल्या. (त्याची कारणे काहीही असोत) त्यामुळे सहकारी बॅंकेने दुसऱ्या सहकारी बॅंकेत विलीनीकरण ही बाब सहकारी क्षेत्राने समजून घेतली, पटवून घेतली(नाईलाज म्हणून) पण या विचारप्रणालीला पहिला धक्का दिला तो पुण्याच्या सहकारी बॅंकेने. तिचे विलीनीकरण राष्ट्रीयकृत बॅंकेत झाले. काहींना वाटले की, व्यक्तीप्रभावामुळे ही अपवादात्मक घडलेली गोष्ट आहे. त्याही वेळेला आम्हाला हे कळून चुकले की, रिझर्व्ह बॅंकेची पाऊले कोणत्या दिशेने पडत आहेत. नागरी बॅंकेचे व्यापारी बॅंकेत विलीनीकरण करण्याची सुरवात जरी पुण्यात झाली असली तरी आता रिझर्व्ह बॅंकेने हे धोरणच ठरविलेले दिसते आणि त्यामुळे व्यापारी बॅंका आता नागरी बॅंका आपल्यात समावून घ्यावयास हिरहिरीने पुढे येतील हे नक्की. रिझर्व्ह बॅंकेने दि. 24.02.2010 रोजी पत्र काढून नागरी बॅंकांचे व्यापारी बॅंकेत विलीनीकरणाची मार्गदर्शक तत्वेच आखून दिली आणि दरवाजा सताड उघडला आहे. ही मार्गदर्शक तत्वे पाहिली तर ज्या बॅंकांची 31.03.2007 रोजी भागाची किंमत उणे झालेली आहे. अशा बॅंका विलीनीकरणास पात्र ठरवल्या आहेत. ही तारीख काळाच्या ओघात वाढवली जाणार हे निश्चितच, त्याचप्रमाणे ज्या राज्य सरकारांनी रिझर्व्ह बॅंकेबरोबर समजुतीचा करार केलेला आहे त्या राज्यातील नागरी बॅंका याला पात्र राहतील.(आता सर्व राज्यांनी असा करार केलेला आहे) त्याचप्रमाणे विलीनीकरण करून घेणाऱ्या बॅंकेने यासाठी प्रशासकीय मान्यता मिळविली पाहिजे. ज्या तारखेला हे विलीनीकरण करावयाचे आहे त्याच्या आदल्या दिवसाचे ऑडीट कम ड्यु डिजिलन्स पूर्ण केलेले पाहिजे. या साठीचा सी.ए.हा ट्रान्सफरी बॅंकेने विमा महामंडळाच्या संमतीने नेमावयाचा आहे. जी बॅंक विलीनीकरण करून घ्यावयाची आहे त्या बॅंकेच्या ठेवी व जबाबदाऱ्या आणि जिंदगी व येणी यांचे मुल्यांकन करून घ्यावयाचे आहे. याचीही मार्गदर्शक तत्वे रिझर्व्ह बॅंकेने आखून दिलेली आहेत. याचा अभ्यास करणे आवश्यक आहे व त्यासाठी ती मुळातूनच वाचणे गरजेचे आहे. थोडक्यात असे म्हणता येईल की, प्रत्यक्ष देणी किती व प्रत्यक्षात मिळणारी येणी किती हे अजमावयासाठीचे हे निकष आहेत. यात महत्वाचा शब्दप्रयोग आहे डिपॉझिट कव्हरेज रेशो. जी बॅंक विलीन करून घ्यावयाची आहे त्या बॅंकेच्या ताबडतोब वसूल होणारी जिंदगी आणि विलीनीकरण करून घेणाऱ्या बॅंकेच्या निधीचे प्रमाण काय आहे यास महत्व आहे. निकषानुसार हा रेशो किमान 65 टक्के असावा म्हणजे विलीनीकरण होणाऱ्या बॅंकेच्या जिंदगीतून त्यांची 65 टक्के ठेवी भागल्या पाहीजेत रेशो कसा काढावयाचा याचाही तपशील रिझर्व्ह बॅंकेने दिलेला आहे तो मुळातून वाचणे आवश्यक आहे. अशा बॅंकेतील ज्या ठेवीदारांच्या ठेवी रू. एक लाखापर्यंत आहेत अशा ठेवीदारांना त्यांच्या 100 टक्के ठेवी परत मिळतील या ठेवीची रक्कम वर म्हटल्याप्रमाणे जिंदगी वसूलीतून (Readily Realizable Asset) परत मिळणार आहेत किंवा ठेव विमा कंपनीमधून किंवा संबंधीत बॅंकेच्या निधीतून मिळतील. यात रू. एक लाखापेक्षा जास्त रक्कम ट्रॅन्स्फरी बॅंक डीआयजीसी कडे क्लेम दाखल करेल. विलीन होणाऱ्या बॅंकेच्या विनातारणी देणेदाराच्या रकमा विलीनीकरण करून घेणारी बॅंक देईल. या बॅंकेच्या जिंदगी वसुलीतून रक्कम वसूल करून (R.R.Assets) त्या रकमा डीआयजीसी कडे वर्ग करेल. थोडक्यात या मार्गदर्शक सूचना ठेवीदारांचे हित कसे सुरक्षित राखले जाईल आणि ट्रान्स्फरी बॅंकेला कसा तोटा होणार नाही या दृष्टीने तयार झालेल्या दिसतात. विलीनीकरण करून घेतलेल्या बॅंकाच्या शाखा बंद करावयाच्या आणि ते परवाने वापरण्याचे स्वातंत्र्यही विलीनीकरण करून घेणाऱ्या बॅंकेला दिलेले आहे. मात्र अशा या योजनेत सेवकांचे आणि सभासदांचे हित सुरक्षीत कसे करता येईल, याची वाच्यता नाही. या बाबीचा नागरी बॅंका आणि प्रतिनीधीक संस्था यांनी विचार केला पाहिजे. यावरून असे वाटते की, नागरी बॅंकांचे व्यापारी बॅंकेत विलीनीकरणासंबंधी रिझर्व्ह बॅंकेच्या मनात अनुकूलता दिसून येते. ठेवीदारांबरोबर आपले सेवक आणि सभासद यांचे हित पहाता आल्यास उत्तम. यात सभासदांचे हित पहाणे अवघड आहे. कारण भागाची नक्त किंमत उणे झाली असेल तरच हे विलीनीकरण आहे या संदर्भात असा विचार होणे जरूरीचे आहे की, अशा बॅंकांचा राखीव निधी हा व्यवहाराबाहेर गुंतवलेला असल्याने अशा राखीव निधीचा उपयोग सभासदांचे भाग रक्कम परत करण्यासाठी व्हावा. असे विलीनीकरण अपरिहार्य आहे. म्हणून रिझर्व्ह बॅंकेने याच पद्धतीने सहकारी बॅंकांनाही दुसरी सहकारी बॅंक विलीनीकरण करून घेण्यासाठी मार्गदर्शन करावे. अन्यथा व्यापारी बॅंक आहेत एकूण काय कालाय तस्मै नम: डॉ. श्री. अविनाश शाळीग्राम संचालक लक्ष्मीकृपा अर्बन को-ऑप. बॅंक लि.,





















